मुंबई : महाराष्ट्र सायबरने मुंबईत धडक कारवाई करत एका ४९ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मोबाईलमध्ये बाल लैंगिक शोषणाचे फोटो आणि व्हिडीओ साठवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे मुंबईत खळबळ पसरली आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सायबरला गुप्त सूत्रांकडून बाल लैंगिक शोषणाचे साहित्य मोबाइलमध्ये डाउनलोड करून साठवणाऱ्या एका संशयित व्यक्तीबद्दल माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच महाराष्ट्र सायबर पथकाने सायबर इंटेलिजन्स साधनांचा वापर करून तपास सुरु केला. .IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक.या तपासदरम्यान, मुंबईतील मालाड पश्चिम येथील रहिवासी सैफुद्दीन जमीरउद्दीन मलिक (वय ४९) याला महाराष्ट्र सायबरने अटक केली. तथापि, या आरोपीच्या फोनमध्ये लहान मुलांचे २० हजारांहून अधिक अश्लील फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करून साठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे..दरम्यान, महाराष्ट्र सायबर टीमने आरोपीला मालाड पश्चिम येथून अटक केली असून सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ८८/२०२६ नोंदवण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC) कलम २९४, पॉक्सो कायद्याच्या कलम १५ आणि आयटी कायद्याच्या कलम ६७(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..Mumbai: झोपडपट्टी नसलेल्या भूखंडांवरून वाद, 'एसआरए'च्या अधिकारांवर महापालिकेचा आक्षेप.२०,००० हून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडिओमहाराष्ट्र सायबर टीमने केलेल्या तपासणीदरम्यान आरोपीच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे २०,००० हून अधिक फोटो आणि व्हिडिओ आढळले आहेत. सध्या आरोपीच्या मोबाईल आणि इतर डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरु असून आरोपीने हे साहित्य कोठून डाउनलोड केले, त्याने ते कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे इतरांसोबत शेअर किंवा वितरित केले का? तसेच या प्रकरणात आणखी कोणी व्यक्ती सामील आहे का? याचा तपास केला जात आहे..Thane Crime: धक्कादायक! २० दिवसांच्या बाळाची विक्री, अडीच लाखांना सौदा; जन्मदात्या आईकडून घेतलं अन् रत्नागिरीत विकलं .महाराष्ट्र सायबरचे आवाहनमुले आणि महिलांवरील ऑनलाइन गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीपीडब्ल्यूसी (CCPWC), ओसीडब्ल्यूसी (OCWC) आणि ट्रेस (TRACE) ही तीन विशेष युनिट्स तयार करण्यात आली आहेत. बाल लैंगिक शोषणाचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करणे, शेअर करणे किंवा प्रसारित करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्यांची तक्रार www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर करता येईल. तसेच सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर देखील तक्रारी दाखल करता येतील, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने नागरिकांना केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.