Maharashtra Bharat Forecast System integration
esakal
मुंबई : महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी (आयआयटीएम) यांच्यात आपत्तीपूर्व तयारी अधिक सक्षम करण्यासाठी झालेल्या सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक स्वदेशी फोरकास्ट सिस्टम’ आपल्या आपत्ती व्यवस्थापनाशी जोडणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य (Maharashtra Bharat Forecast System integration) ठरले आहे. अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, वादळी पाऊस आणि भूस्खलन यांसारख्या तीव्र हवामान घटनांच्या काळात पूर्वतयारी आणि प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.