

Maharashtra Drought News 2026 State Declares Drought in Four More Talukas Taking Total to 308 Amid Rising Water Scarcity
sakal
मुंबई : राज्यातील दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, राज्य सरकारने मंगळवारी आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३०४ वरून ३०८ वर पोहोचली आहे. याशिवाय आणखी नऊ तालुक्यांचे ग्राउंड सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.