महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Maharashtra ekikarna samiti meets Uddhav Thackeray
Maharashtra ekikarna samiti meets Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बेळगाव प्रश्नी खंबीर भूमिका घ्यायची मागणी केली.यानंतर आज संध्याकाळी शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे.

महाराष्ट्र एकाधिकार समितीच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बेळगाव सह सीमा भाग केंद्र शासित करण्याची मागणी केली.मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे न्यावे बेळगावचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली.

शहर समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजी माजी नगरसेवक, खानापूर समितीचे दिगंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर समितीचे शिष्टमंडळ तसेच बेळगाव तालुक्यातील काही नेते यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com