Excise Department : ग्राहकाच्या एक-एक पेगचा हिशेब द्या! उत्पादन शुल्क विभागाचे बारचालकांना आदेश; भेसळ टाळण्यासाठी पाऊल

Liquor Peg : महागड्या मद्याच्या बाटलीत हलक्या प्रतीचे मद्य भेसळ करून त्याची विक्री होत असल्यामुळे शासकीय महसूल बुडत आहे. याशिवाय ग्राहकांचीही फसवणूक होत आहे.
Excise Department
Excise DepartmenteSakal

State Excise Department : भेसळयुक्त मद्याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम सुरू केली आहे. ग्राहकाला दिलेल्या बिलात विक्री केलेल्या मद्याच्या ब्रँडचे नाव, पेगची संख्या, किंमत याचा तपशील नोंदविण्याचा आदेश सर्व परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारचालकांना दिला आहेत. तसेच ग्राहकांनी आपले बिल नीट तपासून घ्यावे, असे आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

राज्य शासनाला मद्य निर्मिती आणि विक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र, राज्यातील परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये महागड्या आणि उच्च प्रतीच्या मद्यात भेसळ सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी विभागाकडे आल्या आहेत. महागड्या मद्याच्या बाटलीत हलक्या प्रतीचे मद्य भेसळ करून त्याची विक्री होत असल्यामुळे शासकीय महसूल बुडत आहे. याशिवाय ग्राहकांचीही फसवणूक होत आहे. याला आळा घालण्यासाठी ग्राहकाला दिलेल्या बिलावर विक्री केलेल्या ब्रँडचे नाव, पेगची संख्या व त्याची किंमत नमूद करण्याचे आदेश दिले आहेत.

यावर पाळत ठेवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच ‘एफएल-३’ अनुज्ञप्तीचे निरीक्षण करतेवेळी मद्य विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या देयक (बिल) प्रतीची पडताळणी करावी. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्याचे आदेशही विभागाने दिले आहेत.

मद्यप्रेमींना आवाहन

ग्राहकांनी महागडे ब्रँडचे मद्य खरेदी करताना बारचालकांनी दिलेले बिल तपासून घेण्याचे आवाहन विभागाने केले आहे. ब्रँडचे नाव आणि पेगची संख्या या बिलात समाविष्ट नसल्यास विभागाकडे थेट तक्रारी करण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यप्रेमींना केले आहे.

अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

बिलाच्या तपशिलासंदर्भातील आदेशाचे काटेकोर पालन न केल्यास कार्यक्षेत्रीय अधिकारी तसेच निरीक्षकांना जबाबदार धरण्यात येईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, निरीक्षकांनी परमीट रूम, हॉटेल, क्लब आणि बारमध्ये जाऊन तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

भेसळयुक्त मद्याला आळा घालण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा. जेणेकरून भेसळयुक्त मद्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे आणखी सोपे होईल. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग

अशी होणार तपासणी

  • ग्राहकांना दिलेल्या बिलाची तपासणी

  • बिलाच्या आधारावर मद्यसाठ्याची मोजणी

  • विक्री झालेला आणि शिल्लक मद्यसाठा तपासणे

  • तफावत आढळल्यास कारवाई

  • खुल्या बाटलीमधील मद्याची तपासणी

  • जादा मद्यसाठा मागवणाऱ्यांवर कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com