Maharashtra farm loan waiver latest news
esakal
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र लाभार्थींचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या लाभार्थी निवडीत अधिक सावध भूमिका घेतली आहे. बँकांकडून प्राप्त झालेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या माहितीसोबत प्राप्तिकर भरणाऱ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीची अंतिम यादी निश्चित केली जात (Ahilyadevi Holkar farm loan waiver scheme) आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्यानिमित्त आज (ता. २२) पहिली यादी जाहीर करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.