Leopard
sakal
मुंबई : भाईंदर पूर्व येथील पारिजात सोसायटी या निवासी संकुलात शिरलेल्या बिबट्याला महाराष्ट्र वन विभागाने सुरक्षितपणे जेरबंद केल्यानंतर, आता त्याला सॅटेलाइट कॉलर लावून नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले आहे. या आधुनिक प्रयोगामुळे बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे अधिक सुलभ होणार आहे.