

Trees Cut down for torrent
ESakal
कर्जत : कर्जत तालुक्यात टोरंट कंपनीच्या सायडोंगर-१ जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३२ हजार झाडे तोडली जाणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. टोरंट कंपनीसाठी सरकार इतके मेहरबान का, असा सवालही यानिमित्त उपस्थित केला आहे.