Water crisis
मुंबई - मुंबईत वाढती बांधकामे आणि लोकसंख्यावाढीमुळे दररोज ३,८०० द.ल.लि.वरून ४,१०० द.ल.लि. इतका पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी नागरिकांना अद्यापही अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची कबुली राज्य सरकारने प्रथमच विधानसभेत दिली. जलसंकट रोखण्यासाठी गारगाईसह चार मोठ्या जलप्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. १०) दिली.