महाराष्ट्र सरकारला राज ठाकरेंची भीती, काँग्रेस नेत्याचा आरोप

राज ठाकरेंना राज्यात जातीय उन्माद पसरवण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
Raj Thackeray Uddhav Thackeray
Raj Thackeray Uddhav ThackeraySakal

मुंबई : राज्य सरकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना घाबरत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे. यामुळेच औरंगाबाद येथे 1 मे रोजी झालेल्या मेळाव्यात ‘अटी’ चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर राज्य सरकार कारवाई करण्यात येत नसल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी म्हटले आहे. औरंगाबादेतील सभेदरम्यान अटी मोडल्याप्रकरणी राज ठाकरे यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज ठाकरेंना राज्यात जातीय उन्माद पसरवण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. (Sanjay Nirupam Allegation On Mahaviak Aghadi Government )

Raj Thackeray Uddhav Thackeray
आरक्षण असो किंवा नसो, भाजप २७ टक्के ओबीसींना तिकीट देणार, फडणवीसांची घोषणा

यावेळी निरुपम यांनी राज्य सरकारवर आरोप करत मनसे प्रमुखांवर मुंबई पोलीस कारवाई करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबादमध्ये सभा घेण्यासाठी काही नियम ठरवण्यात आले होते, त्यापैकी राज यांनी 12 नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यानंतर राज यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या सर्व घडामोडींनंतर पोलिसांनी आजपर्यंत त्यांच्यावर का कारवाई केली नाही? असे म्हणत राज्यातील उद्धव सरकार राज ठाकरेंना घाबरले असल्याचे ते म्हणाले.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, असेही निरुपम म्हणाले. मी सरकारला घाबरू नका, असे आवाहन करतो. कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असा राज्यासह देशभरात नियम असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Raj Thackeray Uddhav Thackeray
"उद्धव ठाकरेंकडून..."; नवनीत राणांना टॅग करत उमा भारतींचा निशाणा

1 मे रोजी औरंगाबादमध्ये आयोजित सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकरचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच राज्यातील सर्व मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंतची मुदत दिली होती. यासोबतच सरकारने त्यांची मागणी पूर्ण न केल्यास त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मशिदींसमोर दुहेरी आवाजात हनुमान चालीसा वाजवतील, असा इशाराही दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com