
मुंबई : राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या रेल्वे मार्गांवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा ३बी आणि पुणे–लोणावळा तिसरी व चौथी लाईनला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे मुख्य मार्गिका आणि उपनगरीय मार्गिका वेगळ्या होणार असून प्रवाशांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.