

Maharashtra IPS Transfer Reassigns Officers
ESakal
महाराष्ट्र पोलीस दलात अवघ्या सहा दिवसांत झालेल्या दोन मोठ्या बदल्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरकारने पोलीस दलात मोठ्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार एकूण ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदस्थापना बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये सात विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजीपी), पाच पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी), ११ एसपी/आयपीएस आणि १८ एसपीएस-स्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.