

Big Relief for Residents Liquor Shops Cannot Relocate Without Society's Consent
ESakal
राज्य सरकारने महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आणली आहे. आता कोणत्याही निवासी किंवा व्यावसायिक इमारतीमध्ये नवीन दारूचे दुकान उघडण्यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्थेची परवानगी घेणे आवश्यक असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या दारूच्या दुकानाचे स्थलांतर करण्यासाठीही हाच नियम लागू होतो. गृह विभागाने या संदर्भात एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.