महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा..

महाविकास आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा..

राज्यात मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजेच महाराष्ट्रातील सरकार आता पडलंय हे उघड आहे. अशात आता राज्यपालांना महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी महाविकास आघाडीला निमंत्रण द्यावं लागेल. कालच महाविकास आघाडीकडून राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचं समर्थनपत्र देण्यात आलंय. त्यामुळे आता राज्यपालांना महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी  बोलावलं लागेल.   राज्यपालांनी तसं न करता विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला, किंवा तशी शिफारस केली तर मात्र हा प्रश्न पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो.  

औटघटीकेचं  सरकार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. अशात महाराष्ट्रात भाजपने अजित पवार यांना हाताशी धरत सरकार स्थापन केलं. महाराष्ट्रातील हे सरकार औटघटीकेचं ठरलंय. अवघ्या 78 तासात महाराष्ट्रातील सरकार पडल्याचं चित्र आता महाराष्ट्रासमोर आहे. 

उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला, त्यानंतर काहीच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री या अतिथीगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे जाऊन आपला राजीनामा सुपूर्त करणार आहेत.  त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचं सरकार आता कोसळलंय हे स्पष्ट होतंय.  

दरम्यान आता महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा रस्ता मोकळा झाल्याचं दिसतंय. 

Webtitle : road for mahavikas aaghadi is clear as devedra fadanavis resigns from the post of chief minister of maharashtra 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com