

Mahatma Phule Health Scheme
ESakal
महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (१० जुलै) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना अधिक व्यापक आणि रुग्ण-केंद्रित करण्याच्या दिशेने सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी विधानसभेत घोषणा केली की, या योजनेत आता प्राथमिक स्तरावर पीईटी स्कॅनचा समावेश केला जाईल. याव्यतिरिक्त, कर्करोगाशी संबंधित उपचारांसाठी रुग्णांना अधिक आर्थिक मदत दिली जाईल.