

Dahisar high frequency radar
ESakal
मुंबई : उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे, दहिसर, मागाठाणे आणि बोरिवली येथील रहिवाशांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दहिसरमधील त्यांचे उच्च-फ्रिक्वेन्सी रडार स्टेशन गोराई येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या हजारो गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांना नवी चालना मिळेल.