esakal | ब्रेकिंग - गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाता येणार; CSMT, LTT, मुंबई सेंट्रल तर वांद्रे टर्मिनसमधून सुटणार गाड्या
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग - गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाता येणार; CSMT, LTT, मुंबई सेंट्रल तर वांद्रे टर्मिनसमधून सुटणार गाड्या

कोकणात किती आणि कशाप्रकारे गाड्या सोडल्या जाव्यात याबाबतचे प्लॅनिंग आधीच तयार होतं. काल रात्री उशिरा महाराष्ट्र राज्य सरकारने कोकण रेल्वे आणि  सोबतच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला याबाबची परवानगी दिलेली आहे.

ब्रेकिंग - गणपतीसाठी रेल्वेने कोकणात जाता येणार; CSMT, LTT, मुंबई सेंट्रल तर वांद्रे टर्मिनसमधून सुटणार गाड्या

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : गणेश उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. गेले काही दिवस कोकणात रेल्वे सोडणार की नाही यावरून राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं. मुंबईतील चाकरमान्यांकडून देखील सातत्याने कोकणात जाण्यासाठी रेल्वे सोडल्या जाव्यात अशी मागणी केली जात होती. मधल्या काळात केंद्राकडून परवानगी असताना राज्याकडून परवानगी मिळत नसल्याच्या बातम्या देखील  समोर येत होत्या. अशात आता अखेर कोकणात गणेशोत्सवासाठी रेल्वे गाड्या सोडण्यास राज्याकडून हिरवा कंदील मिळालाय. त्यामुळे आता चाकरमान्यांना नियमांचे पालन करून रेल्वेने कोकणात जाता येणार आहे. याबाबतची माहिती सेंट्रल रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलीये. 

INSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय ?

कोकणात किती आणि कशाप्रकारे गाड्या सोडल्या जाव्यात याबाबतचे प्लॅनिंग आधीच तयार होतं. काल रात्री उशिरा महाराष्ट्र राज्य सरकारने कोकण रेल्वे आणि  सोबतच मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला याबाबची परवानगी दिलेली आहे. रेल्वेकडून कोकणात गाड्या सोडण्याची राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर मध्य रेल्वे कोकणात गणेशोत्सवासाठी १६२ फेऱ्या  चालवणार आहे 

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान १६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी, चिपळूण, कुडाळ अशा फेऱ्या घेण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेकडून मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस इथून रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ आणि सावंतवाडी अशा रेल्वेच्या फेऱ्या घेण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून १६२ तर पश्चिम रेल्वेकडून १५० पेक्षा अधिक रेल्वे सोडण्यात येणार असल्याचं समजतंय. 

आनंदाची बातमी - मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार; 13 दिवसांत तीन महिन्यांचा पाणीसाठा

मिळालेल्या माहितीनुसार याचं ता ट्रेन्सचं बुकिंग थोड्यावेळात अधिकृत परवानगी आल्यावर सुरु होणार आहे. IRCTC वरून या गाड्याचं बुकिंग करता येऊ शकतं.  अधिकृत कन्फर्म तिकीटधारकांना या गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे. उद्यापासून म्हणजेच १५ ऑगस्टपासून या गाड्या कोकणात सोडायला जाणार आहे असंही टीव्ही रिपोर्टनुसार समोर येतंय. दरम्यान महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना E पास ची गरज भासणार नाही. त्यांचं तिकीट हाच त्यांचा  E पास असणार आहे. 

maharashtra government gave green signal for ganesh utsav special trains to konkan