INSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय ?

INSIDE NEWS : काल पार्थ पवार सिल्व्हर ओक वर गेल्यावर तिथं घडलं काय ?

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी धाव घेतली, यावेळी त्यांनी अजाणतेपणी चूक झाल्याची दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. यावेळी पार्थ यांची शरद पवार यांचीही भेट घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सीबीआय प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारले आहे. पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी भाष्य करत माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नसल्याचे सांगितले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शरद म्हणाले, माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो अप्रगल्भ आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशी करायची असेल तर मी विरोध करणार नाही. मात्र, माझा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध असण्याचे कारण नाही. शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहिररित्या फटकारल्यानंतर काल सायंकाळी अजित पवार आणि जयंत पाटील यांनी पवार यांची भेट घेतली होती, मात्र ही भेट नियमित असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली होती. 

अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते, तसेच या संदर्भात आपणही पार्थ पवार यांना आधीच समज दिल्याचे सांगत अजित पवार यांनी पवारांना माहिती दिली. बैठकीत पार्थ यांचा कोणताही मुद्दा चर्चेला नव्हता.भेट पूर्वनियोजितच होती. अजितदादा अजिबात दुखावलेले नाहीत.पवार कुटुंब वा राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नसल्‍याचे राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  बैठकीनंतर सांगितले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली, ही भेट देखील शासकीय कामकाजा संदर्भात होती, असे सांगण्यात आले.

गेल्या दोन दिवसांतील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी काल सांयकाळी शरद पवार यांच्याकडे निवासस्थानी जाऊन सुप्रिया सुळे यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केल्याचे समजते, यावेळी कोणतेही भूमिका आणि वक्तव्य करण्यापूर्वी पक्षातील जेष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करण्याचा सल्ला सुप्रिया यांनी पार्थ पवार यांना दिल्याचे सांगण्यात आले.

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रावादीच्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची आहे. बुधवारी संध्याकाळी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अगोदर शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी पार्थ पवार सुप्रिया यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे हे प्रकरण निवळण्यात सुप्रिया यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानण्यात येते.

( संकलन - सुमित बागुल )

what happened on silver oak after parth pawars visit read full news

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com