मुंबईत 26 जानेवारीपासून नाईट लाईफ 

मुंबईत 26 जानेवारीपासून नाईट लाईफ 

मुंबई - रात्रंदिवस जागे राहणारे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई शहरांत आता रहिवासी वसाहती नसलेल्या ठिकाणाच्या मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईची लाईट लाईफ सुरु होणार आहे. गुरुवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला पोलिस आयुक्त संजय बर्वे तसेच शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरन्टचे प्रतिनिधीही उपस्थित होते. नाईट लाईफ ही शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. 2013 पासून याबाबत विचार सुरु आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून हे शहर 24 तास जागे असते. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवनावश्‍यक बाबींची नागरिकांना आवश्‍कता असते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल्स, मॉल्स जीवनावश्‍यक गोष्टींची दुकाने, हॉटेल्स दिवस-रात्र सुरू ठेवल्यास पर्यटक आदींची सोय होऊ शकेल. रोजगार निर्मिती करणे, पर्यटन वाढवणे हा उद्देश यामागे आहे.

नाईट लाईफचा मुंबईकरांना त्रास होणार नाही 

मुंबईत मर्यादीत आणि बिगर निवासी भागात हॉंटल, मॉंल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत. मुंबईतील नरीमन पॉंईट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होईल. नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे. मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नाही. कारण मुंबई आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणा-यांना मुंबई शहर मागे रहावे असे वाटतेय का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे हॉंटेल, मॉंल्स, थिएटर मधील उद्योग आणि रोजगार वाढणार आहे. 
- आदित्य ठाकरे, पर्यटन मंत्री  

वर्षभरापूर्वी सरकारने अधिसूचना जारी केली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे याला हिरवा कंदील मिळाला नव्हता. गुरुवारी झालेल्या बैठकीत नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात नाईट लाईट सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रहिवासी वसाहत नसलेल्या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. मद्यपानला परवानगी देण्यात आलेली नाही. रात्रीची आस्थापना सुरु ठेवण्यासाठी सेवांचे नियमन, अटी तयार करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. वरळीतील ऍट्रिया मॉल, घाटकोपरमधील आरसीटी मॉल, गोरेगावमधील ऑबेरॉय मॉल, फिनिक्‍स आदी 25 मॉल्समध्ये नाईटलाईफसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातील अनेक दुकाने, रेस्टॉरन्ट आदी आस्थापने 24 तास उघडी ठेवता येणार आहेत. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. मात्र यांमध्ये मद्यपान करण्यास परवानगी नसेल. व्यवसायातील फायद्याच्यादृष्टीने आठवडाभर 24 तास उघडे ठेवायची की नाही, हा निर्णय त्यांच्या मालकांवर अवलंबून राहणार आहे. मुंबई महापालिका व पोलिसांनी शहरभरातील अशा आस्थापनांना 26 जानेवारीपासून परवानगी दिली आहे. 

मुंबईला पर्यटन केंद्र बनवण्याच्या दृष्टीने झालेल्या हा निर्णय स्वागर्ताह आहे. नाईट लाईफसाठी कर्मचारी व त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने नियोजन करावे लागेल, त्याला थोडा वेळ लागेल. हॉटेल ऍण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनचे अध्यक्ष गुरबीर सिंग यांनी सांगितले. 

नाईट लाईफवर सीसीटिव्ही कॅमे-याची नजर

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात नाईट लाईफ सुरु झाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र या सर्व ठिकाणी सीसीटिव्ही कॅमे-याची नजर राहणार आहे. वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही, यासाठी पार्किंगची सोय उपलब्ध असणार आहे. वसाहतीच्या ठिकाणी असलेल्या मॉल्स व आस्थापनांना परवानगी नसेल. शांतता भंग पावणार नाही, यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने विचार करून याला परवानगी देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

maharashtra government gave permission for mumbai night life

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com