

CM Relief Fund
ESakal
राज्यातील सामान्य रुग्णांसाठी एका ऐतिहासिक निर्णयात महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री मदत निधीच्या अर्ज प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील आठवड्यात एक नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू करत असून त्यामुळे संपूर्ण मदत प्रक्रिया डिजिटल आणि कागदविरहित होणार आहे. या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, रुग्णांच्या कुटुंबीयांना आता अर्ज करण्यासाठी मुंबईतील मंत्रालयात धावपळ करावी लागणार नाही.