

Government Action On Illegal Fishing
ESakal
महाराष्ट्राची सागरी सीमा अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि अवैध मासेमारीला कठोरपणे आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी किनारी सुरक्षा आणि सर्वेक्षण कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी विभागाला तातडीने १० नवीन आधुनिक ड्रोन खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.