Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! ९९ वर्षांच्या लीज जमिनींचा गुंता सुटणार; महायुती सरकारने महत्त्वाचे नियम बदलले

Mumbai Freehold News: महाराष्ट्र सरकारने मुंबईतील भाडेपट्ट्यावरील जमिनीचे मालकी हक्कात रूपांतर करण्याचे नियम शिथिल केले आहेत. निवासी मालमत्तांवरील मुद्रांक शुल्क ०.५% पर्यंत कमी करण्यात आले आहे.
leasehold land rules

leasehold land rules

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारने ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिलेल्या जमिनींबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता गृहनिर्माण सोसायटीची जमीन वर्ग २ (लीजहोल्ड) मधून वर्ग १ (फ्रीहोल्ड) मध्ये रूपांतरित करणे अधिक सोपे झाले आहे. सरकारने नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात लक्षणीय कपात केली असून नियम सोपे केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com