

Ro-Ro Ferry Boat
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : गणेशोत्सव, दसरा, दिवाळी संपूनही सुरू न होऊ शकलेल्या मुंबई ते कोकण रो-रो बोटसेवेसाठी आता राज्य सरकार थेट आर्थिक मदतीचा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत आहे. प्रवासी तिकीट दर आणि प्रचंड इंधनखर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याने ही सेवा व्यावसायिकदृष्ट्या परवडत नाही, असा निष्कर्ष निघाल्यानंतर महाराष्ट्र सरकार ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (व्हीजीएफ) देण्याचा विचार करीत आहे. विशेष बाब म्हणजे, आजवर देशात कोणत्याही प्रवासी बोटसेवेला राज्य सरकारकडून थेट आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात मात्र काही मंत्र्यांच्या हट्टापायी हा नवा प्रयोग केला जात असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.