

Construction Costs To Fall In Naxal Affected Areas As Maharashtra Government Removes Additional Charges For Projects
sakal
मुंबई : नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील विकासकामांना प्राधान्य मिळावे यासाठी या भागातील बांधकामांवर आकारण्यात येणारे अनुक्रमे २० टक्के आणि १० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे या मागासलेल्या भागात बांधकामे वाढून या भागाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.