निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मोठा दिलासा; पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चक्री वादळामुळे बाधित झालेल्या 7 लाख 69 हजार 335 शिधापत्रिकाधारकांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतला.

नवी मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. चक्री वादळामुळे बाधित झालेल्या 7 लाख 69 हजार 335 शिधापत्रिकाधारकांना मोफत केरोसीन देण्याचा निर्णय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतला. जिल्हयाचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.    

वाचा ः सीआयएसएफ जवावांसोबतच दुजाभाव; 'स्वप्नपूर्ती'तील घरे खाली करण्यासाठी दबाव...

अरबी समुद्रात तयार झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्हयातील अनेक भागात नुकसान झाले. वादळामुळे संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडले, वाहतूक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक फटका अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यातील महावितरणच्या विद्युत यंत्रणेचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्याबाबत महावितरणला आदेश देण्यात आले आहेत. मात्र मूळात अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा अवधी लागणार आहे. केरोसीन नसल्यामुळे येथील लोकांना घरामध्ये कंदिल, दिवे लावण्यासाठी अडचणी उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

वाचा ः रसिक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'; वाचा कधी येणार तर...

केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, मत्स्यव्यवसाय, धार्मिक समारंभ, यात्रा व मेळावे आदी प्रयोजनांसाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन राज्यास उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित 7 लाख 69 हजार 335  शिधापत्रिकाधारक कुटुंबांना प्रतिशिधापत्रिका पाच लिटर केरोसिन वितरित करण्यासाठी विनाअनुदानित दराचे केरोसिन नियतन मंजूर करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra govt decides to give free kerosene to nisarga cyclone affected person