

Big Relief for Maratha Youth as State Approves Additional ₹150 Crore Fund
sakal
मुंबई: मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला असतानाच सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियोजन विभागाकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात हा निधी वितरित करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना मोठा आधार मिळणार आहे.