रशियातील ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या बैठकीत महाराष्ट्राला मान

एआयएमटीसीचे सदस्य बाबा शिंदे भारताचे प्रतिनिधित्व करणार
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : असोयाम संस्था, दिल्ली (Delhi) व परराष्ट्र दुतावास विभाग मास्को रशिया (Russia) तसेच परराष्ट्र दुतावास रसीयन फेडरेस दिल्ली यांचे संयुक्त विद्यामाने मास्को, पीटसबर्ग रशिया येथे 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ऑटोमोटीव्ह (Automotive) उद्योगाच्या बैठकीत महाराष्ट्राला मान मिळाला आहे. पुणे (Pune) येथील रहिवासी असलेले ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे संचालक सदस्य बाबा शिंदे (Baba Shinde) रशियामध्ये भारताचे (India) प्रतिनिधित्व करणार आहे. या बैठकीसाठी 24 संप्टेंबर रोजी शिंदे रशिया रवाना होणार आहे.

या बैठकीत ऑटोमोटीव्ह, ड्रग्स अँड फर्म्युसिटीकल, केमिकल्स, रियल इस्टेट, प्लास्टिक, शेती, सागरी उत्पादने, सिरॅमिक्स, चहा, तंबाखू, कॉफी, लेदर, अभियांत्रिकी वस्तू, रत्ने आणि दागिने, पर्यटन, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. ज्यामध्ये ऑटोमोटिव्ह उद्योगसंदर्भात बाबा शिंदे भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगाची माहिती देणार आहे. शिवाय नवनवीन प्रयोगावर अभ्यास केला जाणार आहे.

Mumbai
वसई : 'या' क्षेत्रातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित; मोहीम ठप्प

शिंदे यांच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कार्याबद्दल 2001 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक व प्रतिनिधी महासंघाचे ते अद्यक्ष आहे. त्यासोबतच सफारी ग्रुप फॅसिलिटी सर्विसेस या त्यांच्या कंपनीमार्फत सुमारे साडेसहाशे कामगार सुरक्षा व हाउसकिपींग विभागात कार्यरत असून सदर कंपनीमार्फत पुणे, मुंबई, सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी जाहिरात उद्योग व्यवसायात शिंदे कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com