

IAS Transfer Maharashtra Government Reshuffle
esakal
Devendra Fadnavis Government : महाराष्ट्रात मागच्या १ महिन्यापासून प्रशासकीय यंत्रणेत मोठे फेरबदल होताना पहायला मिळत आहेत. दरम्यान, राज्य सरकारकडून चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महापारेषण, अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जलसंपदा विभागातील महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आयएएस अधिकारी पी. वेलरासू यांची अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा बदली झाल्याने प्रशासकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.