

State Cabinet Clears Modernisation of ITIs Across Maharashtra
Sakal
मुंबई: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) ‘पीएम सेतू योजने’अंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी ‘पीएम सेतू योजने’तून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे त्यासाठी ‘हब अँड स्पोक’ प्रारूप विकसित केले जाणार आहे.