chandrashekhar bawankule
sakal
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि महसूल व वन विभागाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी 'महाराष्ट्र लँड बँक' आणि 'महाभूमी स्टॅक' या प्रणालींचे लोकार्पण करण्यात आले. गरवारे क्लब हाउसमध्ये आयोजित कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रणालींचे उदघाटन पार पडले.