युतीत मनोमिलनाचा 'बार', तर आघाडीत राजकीय 'वॉर' 

संजय मिस्कीन
गुरुवार, 3 मे 2018

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अखेर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत भ्रमाचा भोपळा फुटला असताना, स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये मात्र "तुझ्या गळा माझ्या गळा'चे नाते जुळले आहे.

मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अखेर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत भ्रमाचा भोपळा फुटला असताना, स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेना भाजपत मात्र "तुझ्या गळा, माझ्या गळा'चे नाते जुळले आहे. राज्याच्या राजकारणात आगामी युती व आघाडीचे भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसमधला बेबनाव पुन्हा समोर आल्याने आघाडीची मोट बांधण्याच्या अगोदरच तुटल्याचे चित्र आहे. यामुळे सहाच्या सहा मतदारसंघांत मतदारांसाठीचा घोडेबाजार तेजीत होण्याची शक्‍यता असून, "क्रॉस' व्होटिंगच्या भीतीने उमेदवार हादरले आहेत. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापुढे कोणत्याही निवडणुकीत भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, विधान परिषदेच्या सहा जागांसाठी तीन जागांवर उमेदवार उभे करत कोणत्याही जाहीर घोषणेशिवाय भाजपसोबत युतीचा छुपा समझोता केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कितीही संघर्षाचे वातावरण पेटलेले असले तरी, सत्तेच्या व्यासपीठावर मात्र युती धर्माची पाठराखण केली जात असल्याचे मानले जाते. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांतही युती अभेद्य राहण्याची हे चिन्हे असल्याचे जाणकार मानतात. दरम्यान, विरोधी पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मात्र अनपेक्षितपणे बिघाडीचे चित्र समोर आले आहे. कॉंग्रेसकडे असलेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीने कॉंग्रेसला विचारात न घेता उमेदवार उतरवला. त्यामुळे हवालदिल कॉंग्रेसनेदेखील या मतदारसंघात लढण्याचा निर्णय जाहीर करत आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचा इशारा दिला. 

राष्ट्रवादीने या वेळीही कॉंग्रेसला धोबीपछाड देत आक्रमक राजकीय चढाई केल्याचे मानले जाते. देशभरात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीच्या या पवित्र्याने कॉंग्रेस मात्र हतबल झाली आहे. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यात रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. 

राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्याने कॉंग्रेस हतबल 
विरोधी पक्ष कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मात्र अनपेक्षितपणे बिघाडीचे चित्र समोर आले आहे. कॉंग्रेसकडे असलेल्या लातुर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीने कॉंग्रेसला विचारात न घेता उमेदवार उतरवला. त्यामुळे हवालदिल कॉंग्रेसनेदेखील या मतदारसंघात लढण्याचा निर्णय जाहीर करत आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचा इशारा दिला. 

राष्ट्रवादीने यावेळीही कॉंग्रेसला धोबीपछाड देत आक्रमक राजकीय चढाई केल्याचे मानले जाते. देशभरात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असताना राष्ट्रवादीच्या या पवित्र्याने कॉंग्रेस मात्र हतबल झाली आहे. विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. यामधे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश आहे. 

Web Title: Maharashtra legislative assembly election Congress NCP Voting Diverted Shivsena BJP fight together