

Forest Fire Case
ESakal
मुंबई : महाराष्ट्रात २०२३-२४ या वर्षात वणवा पेटल्याच्या पाच हजारांहून अधिक घटना घडल्या असून त्यात ११,५८०.७०७ हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी की विधानसभेत दिली. वणवा आणि जंगलतोडीबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.