खासगी बस वाहतूकदारांना RTO चा दणका; राज्यभरातून 213 बसगाड्या जप्त

प्रशांत कांबळे
Saturday, 6 February 2021

सुरक्षाविषयक नियमांना डावलून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर विशेष तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली.

मुंबई  - सुरक्षाविषयक नियमांना डावलून प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर विशेष तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात आली. शनिवारी पहाटे 6 वाजेपर्यंत विविध पथकांनी मिळून केलेल्या कारवाईत राज्यभरात 3,062 खासगी बसची तपासणी केली. या वेळी नियम मोडणाऱ्या 213 बसगाड्या जप्त करण्यात आल्या. बसगाड्या सुटण्याच्या ठिकाणी, तसेच मुख्य रस्त्यांवर ही कारवाई करण्यात आली.

ठाणे, पुणे, कोल्हापूर, अमरावती आणि धुळे विभागात वाहनांची तपासणी करण्यात आली; तर पुणे विभागात सर्वाधिक 43 वाहने जप्त करण्यात आली. त्याखालोखाल ठाणे 32, लातूर 25, अमरावती 25 वाहने जप्त करण्यात आली. 

 

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. परराज्यातील खासगी बसगाड्या राज्यात प्रवेश करीत असल्याचे आढळून आले. गरज पडल्यास ही मोहीम पुन्हा हाती घेतली जाणार आहे. 
- अविनाश ढाकणे,
आयुक्त राज्य परिवहन विभाग 

 

 

कारवाई अशी... 
- विनापरवाना वा परवान्याच्या अर्टींचा भंग करून वाहन चालविणे 
- टप्पा वाहतूक 
- प्रवासी बसमधून बेकायदा मालवाहतूक 
- योग्यता प्रमाणपत्र, वाहनाचा परावर्तक, दिशादर्शक, वाहनाच्या मागील दिव्यांची तपासणी 
- वाहनांमधील बेकायदा फेरबदल 
- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक 
- मोटार वाहन कर 
- जादा भाडे आकारणी 
----------- 

विभाग - वाहन तपासणी संख्या - जप्त वाहनांची संख्या 
मुंबई सेंट्रल - - 56 - 3 
मुंबई पूर्व - - 59 - 3 
मुंबई पश्‍चिम 108-3 
ठाणे - 539 - 32 
पनवेल 258 - 8 
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
.... 
राज्य 
पुणे - 472 - 43 
कोल्हापूर -- 301 - 17 
लातूर - - 163 - 25 
नांदेड - - 70 - 10 
अमरावती - 216 - 25 
नाशिक - 138 - 12 
धुळे - 209 - 7 
औरंगाबाद - 142 - 15 
नागपूर शहर - 138 - 5 
नागपूर ग्रामीण - 164 - 5 
आयुक्त कार्यालय - 29 - 0 

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

 maharashtra mumbai marathi news 213 illegal private buses were seized during the raid latest update

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra mumbai marathi news 213 illegal private buses were seized during the raid latest update