esakal | Petrol Diesel Price | डिझेलच्या दरवाढीचा लालपरीला फटका; तोट्यात कोटींची भर
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol Diesel Price | डिझेलच्या दरवाढीचा लालपरीला फटका; तोट्यात कोटींची भर

इंधन दरवाढीमुळे राज्यात एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे

Petrol Diesel Price | डिझेलच्या दरवाढीचा लालपरीला फटका; तोट्यात कोटींची भर

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई - इंधन दरवाढीमुळे राज्यात एसटी महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी एसटी वाहनांची संख्या जास्त होती. दैनंदिन 12 लाख लिटर डिझेलचा वापर केला जात होता; मात्र या वर्षी वाहनांची संख्या कमी आणि दैनंदिन नऊ लाख लिटर डिझेल लागत असताना इंधनाच्या दरवाढीमुळे एसटीच्या डिझेल खर्चात वाढ झाल्याने महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. 

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये एसटी महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर 66 रुपये लिटर होते. त्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारीमध्ये डिझेलचे दर 79 रुपये लिटर आहे. यामध्ये तब्बल 13 रुपयांची दरवाढ झाली असून, त्याचा परिणाम एसटी महामंडळावर दिसतो आहे. त्यामुळे या वर्षी जानेवारीमध्ये सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळालाही सहन करावा लागला आहे. दिवसाला एक कोटीचा तोटा होत महिनाभरात तब्बल 30 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

एसटी महामंडळाने 9 जानेवारीला सततच्या इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीची भाडेवाढ जाहीर केली होती. दरवाढीपूर्वी 38 रुपये प्रतिकिलोमीटर रुपये दर घेतले जात होते. इंधन दरवाढीमुळे त्यामध्ये 4 रुपयांची वाढ करून 42 रुपये प्रतिकिलोमीटर दर सध्या मालवाहतुकीसाठी आकारला जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी वाहतुकीचे भाडेही वाढण्याची शक्‍यता आहे. 

इंधन दरवाढीचा परिणाम जरी महामंडळावर झाला असला तरी सध्या प्रवासी भाडेवाढीसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. यासंदर्भात चर्चाही नाही. 
- राजन शेलार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ 

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

maharashtra mumbai marathi news latest update Petrol Diesel Price hike hits ST bus

loading image