नागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही उद्रेक, अवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली

सुजित गायकवाड
Tuesday, 11 August 2020

सध्याच्या लॉकडाऊन काळात वाढीव रक्कम न भरता येणारी असल्याने वाढीव बिले मागे घ्या, नाही तर आंदोलन करू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता.

नवी मुंबई : टाळेबंदीमुळे आर्थिक टंचाईने कंबरडे मोडलेल्या परिस्थिती ग्राहकांना अवाजवी बील देणाऱ्या महावितरणच्या कार्यालयात मनसेच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. आज सकाळच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यलयात घुसून प्रवेशद्वारावर तोडफोड केली. 

टाळेबंदीच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. टाळेबंदीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सोसायट्यांमध्ये जाऊन मीटर रिडींग मोजता आलेली नाही. मीटर रिडींग न घेतल्यामुळे सर्व ग्राहकांना अंदाजे आणि सरासरी बील देण्यात आली. तसेच याच दरम्यान महावितरणने वाढीव दराची अंमलबजावणी देखील याच काळात केल्यामुळे बिलातील रक्कम अधिकच फुगून गेली.

मोठी बातमी - शंकरराव गडाख यांनी बांधलं शिवबंधन, मातोश्रीवर पार पडला शिवसेना पक्षप्रवेश

  • नवी मुंबई मनसे कार्यकर्त्यांनी Mseb कार्यालय फोडले
  • अवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली
  • वाशी च्या सेक्टर 17 येथील  MSEB कार्यालयाची तोडफड
  • राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलांबाबत मुख्यमंत्र्यांना लिहले होते पत्र
  • पत्रात मनसे झटका देण्याचा केला होता इशारा
  • नागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही  उद्रेक

मोठी बातमी - राजस्थानातील राजकीय भूकंपावर मुंबईतून रेस्क्यू ऑपरेशन, पायलटच्या घरवापसीचं मुंबई कनेक्शन

सध्याच्या लॉकडाऊन काळात वाढीव रक्कम न भरता येणारी असल्याने वाढीव बिले मागे घ्या, नाही तर आंदोलन करू असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला होता. त्यानुसार मनसेच्या विविध भागातील पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून वाढीव बिले मागे घेण्याची मागणी केली होती.

मात्र या महिन्यांत पुन्हा नागरिकांना वाढीव बिले आल्यामुळे आज सकाळी नवी मुंबईतील मनसेच्या निवडक कार्यकर्त्यांनी वाशीतील महावितरणच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. प्रवेशद्वारावर खुर्चीनी तोडफोड करून महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

( संकलन - सुमित बागुल )

maharashtra navanirman sena party workers vandalized mseb office in navi mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra navanirman sena party workers vandalized mseb office in navi mumbai