केरळ पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, डोंबिवलीकडून मदत

Maharashtra Navnirman Mahila Sena from Dombivlikadi helps Kerala flood victims
Maharashtra Navnirman Mahila Sena from Dombivlikadi helps Kerala flood victims

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, डोंबिवली शहरातर्फे जो दरवर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम केला जातो तो यावर्षी रद्द करण्यात आला आहे. त्यासाठी खर्च होणाऱ्या  निधीतून यंदा केरळ येथे उद्भवलेली भीषण पूरपरिस्थिती लक्षात घेऊन तेथील पूरग्रस्त बंधू/भगिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स, औषधे, साड्या, ड्रेसेस, गाऊन, शर्टपँटस्, लुंगी, साबण, तांदूळ, डाळ, कडधान्य इत्यादी साहित्य "केरळ हाऊस, वाशी, नवी मुंबई" यांजकडे शुक्रवारी सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी  जिल्हा संघटक राहुल कामत, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा दिपिका पेडणेकर, महिला सेनेच्या डोंबिवली शहरअध्यक्षा मंदा ताई पाटील, शहरअध्यक्ष मनोज घरत, शहरसंघटक स्मिता भणगे, सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील, उपशहरअध्यक्षा मनाली पेडणेकर, श्रद्धा किरवे, विभाग अध्यक्षा माया माणगावकर, शलाका कानडे, महिला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित  होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com