

NCC PM Internship Scheme
ESakal
मुंबई : महाराष्ट्रातील तरुण आणि माजी एनसीसी कॅडेट्सना करिअर घडवण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत तरुणांसाठी एक मोठा कौशल्य विकास आणि रोजगार उपक्रम सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे येथे प्लेसमेंट शिबिरे आयोजित केली जातील. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा उद्देश एनसीसी कॅडेट्स आणि माजी कॅडेट्सना उद्योगाशी जोडणे, त्यांना भविष्यासाठी सज्ज करणारी कौशल्ये प्रदान करणे आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.