"राजेशाही'तून बाहेर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अखेरीस "राजेशाही'तून बाहेर पडणार आहेत. मुंबईतील सहा नगरसेवकांनी बंडाखोरी केल्यानंतर ते नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते यादरम्यान नगरसेवकांच्या समस्या जाणून घेणार आहेत, असे समजते. 

राज ठाकरे वेळ देत नाहीत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना कंटाळून पक्ष सोडल्याचा आरोप मुंबईतील सहा बंडखोर नगरसेवक करत आहेत. राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नसल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. त्यांच्या "राजेशाही'ची अनेक वेळा चर्चा झाली आहे. मात्र, मुंबई पालिकेतील मनसेचे अस्तित्वच जवळपास संपल्याने राज ठाकरे यांनाही
चांगलाच धक्का बसला आहे. इतर ठिकाणीही असा दगाफटका होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी आता "राजेशाही'तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

नेत्याकडूनही दुजोरा 
मनसेचे कल्याणमध्ये नऊ, नाशिकमध्ये पाच, तर पुण्यात दोन नगरसेवक आहेत. त्यांची राज ठाकरे भेट घेणार आहे. तसेच, या शहरांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्याही ते भेटी घेणार असल्याचे समजते. हा दौरा लवकरच सुरू होणार आहे. मनसेच्या एका नेत्यानेही राज ठाकरे हे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असे स्पष्ट केले.

Web Title: maharashtra news MNS Raj raj thackeray