'आम्ही तो फोन रेकॉर्ड केलाय', देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा

'लोक जगूं दे किंवा मरुं दे, त्यांना राजकारण करायचं आहे'
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस file photo

मुंबई: रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राज्यात सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. भाजपा दमणमधल्या ज्या ब्रूक फार्मा कंपनीकडून ५० हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन विकत घेणार आहे, त्याच कंपनीच्या संचलाकांना काल विलेपार्ले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना या कारवाईबद्दल जाब विचारला.

देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री माध्यमांशी सुद्धा संवाद साधला. "नवाब मलिक आणि काही मंत्र्यांना लोकांशी काही देणघणं नाही. लोक जगूं दे किंवा मरुं दे, त्यांना राजकारण करायचं आहे" अशा शब्दात फडणवीसांनी टीका केली.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार कधी बदलायचंय ते माझ्यावर सोडा !

"चार दिवसांपूर्वी प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर दमणला गेले होते. रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी त्यांनी ब्रूक फार्मा कंपनीला निवेदन दिलं. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा पुरवठा महाराष्ट्राला करायला सांगितला. आम्ही उत्पादन करु शकतो, पण आमच्याकडे निर्यातीचा परवाना आहे. परवानगी मिळत नाही, तो पर्यंत इंजेक्शन देऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडवीय यांच्याशी बोललो. त्यांनी रेड्डी बरोबर ब्रूक फार्माचे टायअप करुन दिले. जेणेकरुन, त्यांच्या लायसन्सवर ब्रूक फार्माला उत्पादन करता येईल. उपलब्ध उत्पादन तात्काळ महाराष्ट्राला द्यायला आम्ही सांगितलं. त्यांनी परवानग्या घ्याव्या लागतील असे सांगितल्यानंतर आम्ही एफडीएची परवागनी घेतली. आमच्याकडे कॉपी आहे. जो काही माल मिळणार होता तो महाराष्ट्रात येणार होता. आज दुपारी महाराष्ट्राचे एफडीएचे जे मंत्री आहेत, त्यांच्या ओएसडीने फोन करुन धमकावलं. त्यांना इंजेक्शन देता आणि आम्हाला देत नाही असे धमकावले. आम्ही ते बोलणं रेकॉर्ड केलय" असा दावा फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस
मृत्यूच्या दाखल्यावरही नरेंद्र मोदींचा फोटो छापा, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

"रात्री ९ वाजता १० पोलीस ब्रूक फार्माच्या अधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्यांना उचलून घेऊन आले. आम्ही कारवाईबद्दल जाब विचारला तेव्हा, पोलिसांनी आम्हाला गुप्तचरांकडून ६० हजार व्हायल्सचा साठा करुन ठेवल्याची माहिती मिळाल्याचे उत्तर दिले. ब्रूक फार्माकडे किती साठा आहे? याबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे का? त्या प्रश्नावर पोलिसांकडे उत्तर नव्हते. एफडीएने परवानगी दिल्याचं पत्र आम्ही दाखवलं. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी, उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर महाराष्ट्राला जास्तीत जास्त पुरवठा करा, असे सांगितले आहे. त्यानंतर हे अशा प्रकारच राजकारण चुकीचं आहे" असे फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com