उद्धव ठाकरेंनी गाडीचे स्टेअरिंग घेतले हातात; काय संकेत? (Video)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) स्वतः गाडी ड्राइव्ह करत पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवरून मालाडच्या दिशेने गेले.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) स्वतः गाडी ड्राइव्ह करत पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवरून मालाडच्या दिशेने गेले. मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये असलेल्या आपल्या आमदारांची भेट घेत उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. या बैठकीत शिवसेना अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा अधिकृत प्रस्ताव नाही : शरद पवार

शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेले आहे. त्यांची व्यवस्था वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये करण्यात आली होती. मात्र, रंगशारदातील अडचण लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या आमदारांची व्यवस्था मालाड येथील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये केली. 'द रिट्रीट'मध्ये शिवसेना आमदारांचा मुक्काम येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री सर्व आमदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज दुपारी या सर्व आमदारांशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चर्चा करणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा  होण्याची शक्यता आहे. भाजपला राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी उचलले 'हे' पाऊल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray driving the car