अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीनासाठीचा मार्ग मोकळा | Anil Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीनासाठीचा मार्ग मोकळा

मुंबई : खंडणी वसुलीच्या आरोपात (extortion Allegations) अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनील देशमुख (Anil deshmukh) यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत (judicial custody) ठेवण्याचे आदेश आज विशेष न्यायालयाने दिले. यामुळे जामीनासाठी अर्ज करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे

हेही वाचा: मुंबईत 'व्हायरल फिवर'चा ताप; वाढत्या प्रदूषणाचा फटका

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्या वर हॉटेल चालकांकडून खंडणी वसूल केल्याचे आरोप केले आहेत. याबाबत ईडिने गुन्हा दाखल केला असून देशमुख यांना अटक केली आहे. आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने त्यांना चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांची औषधे देण्याची आणि वयोमानानुसार बिछाना देण्याचे निर्देश कारागृह विभागाला दिले आहेत. तसेच घरचे जेवण देण्याची त्यांच्या अर्जावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे.

देशमुख यांनी बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे मार्फत वसूल केलेले कथित 4.7 कोटी रुपये हवाला मार्गे दिल्लीत सुरेंद्र जैन आणि विरेंद्र जैन यांना पाठवले आणि तिथून नागपुरात देशमुख यांच्या श्री साई एज्युकेशन इन्स्टिट्यूटला देणगी मार्फत दिले, असा आरोप ईडिने केला आहे. यापूर्वी देशमुख यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने हा आदेश रद्दबातल करुन त्यांना पुन्हा ईडीच्या ताब्यात दिले होते.

loading image
go to top