

Maharashtra Rajbhavan SRPF Constable
ESakal
मुंबई : मुंबई राजभवनात धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे याने रायफलने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी राजभवन परिसरात एकच खळबळ पसरली असून पोलीस आणि एसआरपीएफचे अधिकारी या घटनेचा कडक तपास करत आहेत. अशातच तपासादरम्यान महत्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामध्ये कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांचे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध असून त्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले असल्याची माहिती आहे.