सुरक्षा कमी केल्यानंतर आता राज ठाकरेंच्या दिमतीला 'महाराष्ट्र रक्षक'

सुमित बागुल
Tuesday, 12 January 2021

सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते चांगलेच आक्रमक झालेत.

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने एकीकडे राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आदींसह अनेकांच्या सुरक्षेत कपात केली आहे. अशात सुरक्षा कपातीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी 'महाराष्ट्र रक्षक' घेणार आहेत.

राज ठाकरे यांना 'Z' दर्जाची सुरक्षा होती, ती कमी करून आता 'Y' दर्जावर आणण्यात आल्यानंतर मनसेच्या सरचिटणिसांनी राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र रक्षकांची टीम बनवली आहे. नयन कदम यांनी ही टीम बनवली आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षा कपातीनंतर आता राज ठाकरे यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र रक्षकांवर आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या आसपास काळे कपडे परिधान केलेले महाराष्ट्र रक्षक पाहायला मिळणार आहेत. राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या ठिकाणी हे 'महाराष्ट्र रक्षक' पाहायला मिळतील.  

महत्त्वाची बातमी बिर्याणी पार्टीच्या आड घातपाताचा डाव, इंस्टाग्रामवर मेसेज करून बोलावलं भेटायला

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते म्हणतात : 

सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते चांगलेच आक्रमक झालेत. मनसे नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर नेत्यांकडून आगपाखड देखील करण्यात आली. आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नाही. आम्ही राज ठाकरेंची सुरक्षा करण्यासाठी समर्थ आहोत असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस नयन कदम म्हणालेत.   

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

maharashtra rakshak squad will take care security of MNS chief raj thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra rakshak squad will take care security of MNS chief raj thackeray