आत्महत्येच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; मुंबईतील वाढते प्रमाणही चिंताजनक

मिलिंद तांबे
Sunday, 27 September 2020

आत्महत्यांच्या घटनांत महाराष्ट्र गेल्या वर्षी (2019) पहिल्या क्रमांकावर राहिले आहे.

मुंबई:  आत्महत्यांच्या घटनांत महाराष्ट्र गेल्या वर्षी (2019) पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. सलग तीन वर्षे हे प्रमाण कमी होत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशातून एकूण घटनांच्या 13.6  एवढे हे प्रमाण आहे. त्यानंतर तामिळनाडूचा क्रमांक आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतही याबाबत चिंताजन स्तिती आहे. 

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या 2019 हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यामध्ये देशभरातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील एकूण मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये आजारपण, गरिबी आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करणा-यांची माहीती देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात 21 लाख नागरिक होम क्वारंटाईन; दररोज 15 ते 20 हजार नागरिकांची भर

महाराष्ट्रात 2017 मध्ये 13.6, 2018 मध्ये 13.4 आणि पुन्हा 2019 मध्ये 13.6 टक्के आत्महत्येचे प्रमाण आहे. त्यानंतर तामिळनाडू (9.7), पश्चिम बंगाल (9.1), मध्य प्रदेश (9)आणि कर्नाटक (8.1)
यांचा क्रमांक आहे. 
 2019 मध्ये देशभरात आजारपणाला कंटाळून झालेल्या आत्महत्यांचे प्रमाण 17.1 इतके आहे. या वर्षात  23 हजार 830 जणांनी आत्महत्या केली.  त्यातील सर्वाधिक आत्महत्या  महाराष्ट्रात झाल्या असून वर्षभरात 3 हजार 507 आत्महत्यांची नोंद झाली आहे. राज्यातील आत्महत्यांचे प्रमाण हे 18.5 आहे. त्यात पुरूषांचे प्रमाण अधिक असून 2 हजार 604 पुरूष, तर 903 स्त्रियांनी आत्महत्या केली आहे. तर पुण्यात 76 पुरूष आणि 30 महिला आत्महत्या केली.

बेरोजगारीमुळे ही आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा कारणामुळे राज्यात 452 आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यात 342 पुरूष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे.  तर देशसभरात 2 हजा 852 आत्महत्या झाल्या असून त्यात 2 हजार 509 पुरूष, तर 342 स्त्रियांचा समावेश आहे. 

गरिबीमुळे राज्यात 315 आत्महत्या झाल्या असून  त्यात 281 पुरूष तर 34 स्त्रियांचा समावेश आहे. या कारणामुळे देशभरात  1 हजार 122 लोकांनी आत्महत्या केल्या असून 941 पुरूष तर 181 स्त्रियांचा समावेश आहे.

उत्तर अरबी समुद्रात जपान-भारत नौदल कवायती; सहकार्य वाढवण्यासाठी तीन दिवसांचा कार्यक्रम 

मुंबईत  प्रमाण 4.7 टक्क्यांनी वाढले
2018 या वर्षाच्या तुलनेत राज्यात आत्महत्यांचे प्रमाण 5.3 ने वाढून 15.4 इतके झाले आहे. मुंबईतील आत्महत्यांचे प्रमाण देखील 4.7 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी मुंबईत 1 हजार 229 आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्याआधी 2018 मध्ये मुंबईत 1,174  आत्महत्यांची नोंद झाली होती.  तर चेन्नई  2461, दिल्ली - 2423, बंगळुरू - 2081 आत्महत्या झाल्या आहेत. देशातील 53 शहरांतील आत्महत्येचे एकूण प्रमाण हे 36.6 टक्के इतके आहे.

 

कौटुंबिक समस्याचाही प्रमुख कारण
देशात कौटुंबिक समस्यांमुळे सर्वाधिक आत्महत्या होतात. या समस्यांमुळे होणा-या आत्महत्यांचे प्रमाण हे 32.4 इतके आहे. कौटुंबिक समस्यांमुळे 2468 आत्महत्या झाल्या असून परिक्षेत अनुत्तीर्ण
झाल्यामुळे  1577 , प्रेमभंग  1297 , आजारपण  923 आत्महत्या झाल्या आहेत. 

 

पुरूषांचे प्रमाण अधिक 
देशभरातील आत्महत्येपैकी पुरूषांचे प्रमाण हे  70.2 तर महिलांचे प्रमाण हे  29.8  आहे. तर 2018 मध्ये हे प्रमाण पुरूष 68.5 आणि महिला 31.5 इतके होते. लग्नासंबंधी समस्या, नपुसंकता, हुडा, मुल न होणे ही कारणे आत्महत्येसाठी आहेत. 
........................................
वय वर्ष 18 ते 30 दरम्यानच्या व्यक्तींच्या आत्महत्येचे प्रमाण हे 35.1 टक्के, तर  30 ते 45 दरम्यान आत्महत्या करण्याचे प्रमाण हे 31.8 टक्के इतके आहे. 

 

देशातील सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात 
महाराष्ट्र - 18916       13.6 टक्के
तमिळनाडू - 13493    9.7  टक्के 
पश्चिम बंगाल - 12665     9.1  टक्के
मध्य  प्रदेश - 12457     9.0   टक्के 
कर्नाटक - 11288         8.1 टक्के

 

5 राज्यांत मोठी समस्या
महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या 5 राज्यांत देशातील 49.5 टक्के आत्महत्या झाल्या आहेत. तर उर्वरित 50.5 टक्के आत्महत्या 24 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात नोंदवल्या गेल्या आहेत.  उत्तर प्रदेशमध्ये देशभरातील एकूण लोकसंख्येच्या 16.9 ही सर्वाधिक लोकसंख्या असून तेथील आत्महत्येचे प्रमाण मात्र सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 3.9 टक्के इतके आहे.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra ranks first in this cases