Rickshaw Drivers Uniform Confusion Arisen
ESakal
मुंबई
Mumbai News: 'पांढरा शर्ट व खाकी पॅन्ट'चा संभ्रम, रिक्षाचालकांच्या गणवेशावरून परिवहन विभागाची माहिती
Rickshaw Drivers Uniform: राज्यातील रिक्षाचालकांच्या गणवेशावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे हा संभ्रम लवकर दूर करावा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे.
मुंबई : राज्यातील रिक्षाचालकांचा अधिकृत गणवेश नेमका कोणता, यावरून गाेंधळाची स्थिती कायम आहे. खाकी गणवेश की पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट याबाबत माहितीचा अधिकार कायद्यानुसार विविध अधिकाऱ्यांनी दिलेल्या परस्परविरोधी उत्तरांमुळे याबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, हा संभ्रम लवकर दूर करावा, अशी रिक्षा संघटनांनी मागणी केली आहे.

