

Statewide Kunbi Records Cross 5.89 Million Mark; Uneven Response in Marathwada
Sakal
मुंबई : मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास निर्माण होत असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्यायाधीश संदीप शिंदे समितीने ५८ लाख ८९ हजार ६४१ कुणबी नोंदी शोधल्या आहेत. मात्र सर्वात कमी ४८ हजार ८४४ नोंदी मराठवाड्यामध्ये सापडल्या आहेत. त्याआधारे २ लाख ६९ हजार ५३ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मराठवाड्यातील मराठा - कुणबी प्रश्नाचा स्वतंत्र विचार करण्यासाठी हैद्राबाद गॅझेटचा वापर करण्यात येत असला तरी याआधारे देखील मराठवाड्यामध्ये फार कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत.