Marathi Abhyas Kendra : छटपूजेला भोजपुरी गाणी वाजवली, आता २१ नोव्हेंबरच्या हुतात्मा दिनी महाराष्ट्र गीत वाजवणार का? मराठी अभ्यास केंद्राचे रेल्वेला निवेदन

Maharashtra Song Demand at Railway Stations on Martyrs Day : छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजवल्यानंतर २१ नोव्हेंबरच्या हुतात्मा दिनी महाराष्ट्र गीत वाजवण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला निवेदने देण्यात आली आहेत.
Maharashtra Song Demand at Railway Stations on Martyrs Day

Maharashtra Song Demand at Railway Stations on Martyrs Day

esakal

Updated on: 

नितीन बिनेकर

मुंबई, ता. १६ : छटपूजेनिमित्त रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता महाराष्ट्र गीतांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हुतात्मा दिनानिमित्त २१ नोव्हेंबरला राज्यातील रेल्वे स्थानकांवर महाराष्ट्र गीत वाजविण्यासह विशेष उद्घोषणा करण्याची मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. यासंदर्भात केंद्राने मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाला स्वतंत्र निवेदने दिली आहेत. त्यामुळे छटपूजेनिमित्त भोजपुरी गाणी वाजविणाऱ्या रेल्वे प्रशासनाकडून आता महाराष्ट्र गीतांच्या प्रसारणाबाबत काय भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...