सरकारकडून आली गोड बातमी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करता येणार लोकल प्रवास

तेजस वाघमारे
Wednesday, 11 November 2020

राज्य शासनाकडून मुंबईतील लोकल प्रवासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय

मुंबई ता. 11 : राज्य शासनाकडून मुंबईतील लोकल प्रवासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने घेतलेला निर्णय मुंबई आणि मुंबई MMR भागातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.  

राज्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, निवारण व पुर्नवसन विभागाने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. रेल्वेने ही मागणी मान्य केल्यास लवकरच शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

महत्त्वाची बातमी : नोव्हेंबरमध्ये हिट आणि कोल्डशॉक, तर डिसेंबरमध्ये मुंबई गोठणार

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षणसंस्थांना शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीची सक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांनाही रेल्वे प्रशासनाची सुविधा देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. उपनगरातील विविध भागातून मुंबईतील शाळांमध्ये येणाऱ्या शिक्षकांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात येत होती.

महत्त्वाची बातमी : अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरेंमध्ये जमीन व्यवहार; ठाकरे वैयक्तिक कारणामुळे अर्णब यांना टार्गेट करतायत ? - किरीट सोमय्या

त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने रेल्वेकडे तशी मागणी केली आहे. 23 नोव्हेंबरपासून राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्गदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात शाळेत हजेरी लावणाऱ्या शिक्षकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होणार आहे.

( संपादन - सुमित बागुल )

maharashtra state gives permission to teachers and school staff to travel by train


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra state gives permission to teachers and school staff to travel by train