आणि अजमल कसाब म्हणाला "भारत माता की जय..." 

आणि अजमल कसाब म्हणाला "भारत माता की जय..." 

मुंबई : 'Let Me Say It Now' या पुस्तकातून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी एकापेक्षा एक भयंकर खुलासे केले आहेत. यामध्ये मुंबईतील २६/११ अतिरेकी हल्ल्याबद्दल अनेक मोठे खुलासे करण्यात आलेले आहेत. अजमल कसाब याबद्दलचा आणखी एक मोठा खुलासा यामध्ये करण्यात आलेला आहे. मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान कसाबच्या तोंडून 'भारत माता की जय' असं वदवून घेतलं होतं, असं मारिया यांच्या पुस्तकात लिहिण्यात आलंय.

कसाबने कधी म्हंटल 'भारत माता की जय' :

२६/११ च्या हल्ल्यानंतर काही दिवसांनी पोलिस अजमल कसाबला मेट्रो जंक्शन परिसरात घेऊन गेले होते. याच परिसरामध्ये कसाबने पोलिसांवर केलेल्या गोळीबारामध्ये काही पोलीस अधिकारी शहीद झाले होते. कसाबला तिथे घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी त्याला 'भारत माता की जय' बोलायला सांगितलं होतं आणि कसाबने तसा म्हंटलं असं या पुस्तकात मारिया यांनी लिहिलं आहे.

काय लिहिलंय पुस्तकात:
 
"आम्ही कसाबला घटनास्थळी घेऊन गेलो, पोलिसांचा ताफा मेट्रो जंक्शन परिसरामध्ये दाखल झाला. काही दिवसांपूर्वी याच परिसरामध्ये कसाबने गोळीबार करुन माझ्या प्रिय सहकाऱ्यांचा आणि काही निष्पाप लोकांचा बळी घेतला होता. "खाली वाक आणि कपाळ जमीनीला लाव", असा आदेश मी कसाबला दिला. घाबरलेल्या कसाबने माझ्या आज्ञेचं पालन केले आणि तो कपाळ जमीनीला लावून खाली बसला. आता 'भारत माता की जय' असं मोठ्यानं बोलण्यास मी त्याला सांगितले. तेव्हा कसाब 'भारत माता की जय' असं म्हणाला. त्याच्या तोंडून एकदा 'भारत माता की जय' ऐकून माझं समाधान न झाल्याने मी त्याला दोनवेळा पुन्हा म्हणण्यास सांगितलं," असं मारिया यांनी पुस्तकात लिहिलंय.

let me say it now rakesh maria explained the indecent when kasab said bharat mata ki jay

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com