esakal | मटणावरून मैत्रीत मिठाचा खडा; सुनील मटण संपलंच कसं म्हणत छातीत टाकला...
sakal

बोलून बातमी शोधा

मटणावरून मैत्रीत मिठाचा खडा; सुनील मटण संपलंच कसं म्हणत छातीत टाकला...

मटणावरून मैत्रीत मिठाचा खडा; सुनील मटण संपलंच कसं म्हणत छातीत टाकला...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत दिवसेंदिवस एका मागून एक धक्कादायक घटना घडतायत. अशीच एक भीषण घटना मुंबईतील अंधेरी भागात घडलीये.  बातमी आहे कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या तिघा मित्रांची. त्यादिवशी (सोमवारी) रात्री काम संपवून त्या तिघांनी मस्त मटणाचा बेत केला. मग काय, मटणाचा बेत झालाय म्हंटल्यावर रस्त्यावरच चूल लागली आणि मटण शिजू देखील लागलं. अशातच तिघांपैकी दोघे, म्हणजे नाडर आणि कांबळे यांना दारू प्यायची सवय होती. म्हणून हे दोघे दारू प्यायला निघून गेलेत. त्यांचा दारूचा कार्यक्रम आटोपून दोघे परतले, परतल्यावर मटणाचं भांडं रिकामं पाहिलं आणि तिथेच मिठाचा खडा पडला. त्यांचा मित्र सुनीलने संपूर्ण मटण फस्त केलं होतं. 

मोठी बातमी -  मुंबई-अलिबाग बोट प्रवास तासाभरात! 'हे' आहेत दर...

मटण संपलंच कसं म्हणत नाडर, कांबळे आणि सुनीलमध्ये वादावादी सुरु झाली. या वादावादीचे रूपांतर मारामारीत झालं. दोघांना मटण संपल्याने चांगलाच राग आला होता. या रागाच्या भरात त्यांनी सुनीलच्या पोटात छातीवर जोरदार लाथा बुक्के मारले. हा वाद इतका विकोपाला गेला की या दोघांनी सुनीलला पोटात आणि छातीवर दगडाने देखील धडाधड वार केलेत आणि त्याला तिथेच, तशाच अवस्थेत सोडून निघून गेलेत.     

दरम्यान तिथल्या स्थानिक नागरिकांनी सहार पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुनीलला रुग्नालयात नेण्यात आलं. शवविच्छेदनाच्या अहवालात सुनीलची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. 

मोठी बातमी - आणि अजमल कसाब म्हणाला "भारत माता की जय..." 

याप्रकरणी शहर पोलिसांनी ३८ वर्षीय मुथ्थु नाडरआणि २६ वर्षीय अनिल कांबळे या दोघांना बेड्या ठोकळ्यात. हे दोघे अंधेरी कुर्ला परिसरात फूटपाथवर मयत सुनील सोबत राहायचे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाडर आणि कांबळे यांनी सुनिलला मटणाच्या वादातून मारल्याची कबुली दिली आहे. 

quarrel between three friends over mutton party two friends finished one